नाशिकमध्ये आठ बांग्लादेशींना अटक : कारवाईसाठी पोलीस बनले मजूर


Eight Bangladeshis arrested in Nashik: Police become laborers for action नाशिक (7 फेब्रुवारी 2025) : नाशिकजवळील आडगाव येथील एका बांधकाम साइटवरून आठ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात यंत्रणेला यश आले आहे. विशेष म्हणजे आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी मजुराची वेषभूषा साकारत साईटवर आठ दिवस काम केले व नंतर कारवाई केली.

या संशयीतांवर कारवाई
अटकेतील मुख्य संशयितांमध्ये सुमन कलाम गाझी (27), अब्दुला अलीम मंडल (30), शाहीन मफिजुल मंडल (23), लासेल नुरअली शंतर (23), आसाद अर्शदअली मुल्ला (30), आलीम सुआनखान मंडल (32), अलअमीन अमीननूर शेख (22), मोसीन मौफीजुल मुल्ला (22) यांचा समावेश आहे.



झडतीत बांगलादेशी कार्ड, जन्माचा दाखला सापडला
घुसखोरांकडे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मागितला असता आठपैकी तिघांनी आधार कार्ड तर दोघांनी ग्रामपंचायतीचा दाखला दिला बॅगेच्या झडतीत बांगलादेशी आयडी असलेले कार्ड, बांगलादेशी अक्षरात जन्माचा दाखला मिळून आला. गाझी आणि इतर दोघांकडे नारायणगाव येथील आधार कार्ड मिळून आले. चौकशीत संपूर्ण माहिती देण्यात असमर्थ ठरल्याने त्यांना अटक करण्यात आली.

कोलकाता, आग्रा, पुणेमार्गे नाशिकमध्ये
एजंट सुमन गाझी हाच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले आहे. गाझी गेल्या 12 वर्षांपूर्वी बांगलादेशातून कोलकाता, आग्रा, इंदूरवरून पुण्यात स्थायिक झाला. तो बांधकाम साइटवर कामगार उपलब्ध करून देण्याचे काम करत होता.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !