भुसावळात हद्दपार आरोपी चॅम्पियनला बेड्या

Deported accused champion shackled in Bhusawal भुसावळ (9 फेब्रुवारी 2025) : गुन्हेगारी पार्श्वभूमीवर हद्दपार करण्यात आलेल्या हद्दपार आरोपीचा वावर शहरात असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून संशयीताला अटक केली. आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे (24, रा.पंचशील नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील पंचशील नगर भागात आकाश हा हद्दपार असतानाही वावरत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत संशयीातविरोधात गुन्हा दाखल केला.