रावेर शहरातील चोरीचे तीन गुन्हे उघड : जालना जिल्ह्यातील कुविख्यात त्रिकूटाला बेड्या

22 हजारांचा मुद्देमाल जप्त ः अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


Three theft cases revealed in Raver city : Notorious trio from Jalna district arrested रावेर (10 फेब्रुवारी 2025) : शहरातील विद्यानगर भागातील दुकान फोडीसह इतर चोरीचे गुन्हे उघड करण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील तीन संशयीतांना अटक करण्यात आली.

चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
रावेर शहरातील विद्यानगर भागातील रवींद्र सुरजचंद्र अग्रवाल यांच्या मालकिचे अक्षय किराणा दुकानात 3 रोजी रात्री चोरी झाली होती. लोखंडी कुलूप तोडून चोरट्यांनी एक हजार 540 रुपयांची रोकड, पाचा हजारांचा मोबाईल व दोन हजार रुपये किंमतीचा जुना रेडीओ असा आठ हजार 540 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवल्याने रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



गोपनीय माहितीवरून कारवाई
चोरीचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती तसेच आरोपींनी चोरी केल्यानंतर पोलिसांना प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेजद्वारे माग काढल्यानंतर आरोपी मिटू सटवा काळे (60, रा.घाणेगाव जंब समर्थ कुभार, पिंपळगांव, ता.घनसावंगी, जि.जालना), संदीप बबन चव्हाण (30, रा.रेल्वे स्टेशनजवळ, परतूर, जि.जालना), राकेश सीताराम काळे (40, मंगळुर, ता.मानोद, जि.परभणी) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी घर फोडीसह चोरीची कबुली देत 22 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला.

निरूळ चोरी प्रकरणी एकास अटक
रावेर तालुक्यातील निरुळ चंद्रकांत गोरख पाटील यांची आठ हजार 500 रुपये किंमतीची ईलेक्ट्रीक मोटर चोरी झाली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात आरोपी सीताराम गणपत भील (45, रा. अहिरवाडी) यास अटक करण्यात आली व त्याच्या ताब्यातून ईलेक्ट्रीक मोटर जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपाली पाटील, प्रिया वसावे, हवालदार सुनील वंजारी, कॉन्स्टेबल संदीप घ्यार, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, श्रावण भील यांच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !