अटवाडे येथे ट्रॅक्टर उलटल्याने चालक ठार
Driver killed as tractor overturns in Atwade रावेर (10 फेब्रुवारी 2025) : शेतातून ट्रॅक्टरमध्ये तूर भरून नेत असतांना ट्रॅक्टरचे धड पलटी होऊन त्या खाली दबल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रावेर तालुक्यातील अटवाडा येथे घडला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. रविवारी तालुक्यातील अटवाडे शेती शिवारातील किरण सोपान कोळी यांच्या शेतातील तूर आणण्यासाठी त्यांचा चुलत भाऊ सुनील भिका कोळी (39) हा ट्रॅक्टर घेऊन गेला होता.
धूड अंगावर उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू
ट्रॉलीमध्ये तूर भरून निघतांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेताच्या बांधावरून जात असतांना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रॅक्टर चालविल्याने ट्रॅक्टरचे धूड उलटले व त्यात सुनील दबबला गेल्याने गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला. याबाबत किरण कोळी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉस्टेबल नितीन डांबरे करीत आहेत.







