अंजाळे-वाघळूददरम्यान पाटचारीजवळ कार व मिनीडोरचा अपघात : सात जण जखमी


यावल (11 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील अंजाळे ते वाघळूद या गावादरम्यान पाटचारीजवळ कार व मिनीडोअर वाहनाचा अपघात घडला. या अपघातामध्ये तब्बल सात जण जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालय व काहींना भुसावळ येथील खाजगी रुणालयात हलवण्यात आले. हा अपघात सोमवारी दुपारी घडला. अपघातातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पाटचारीजवळ अपघात
यावल-भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावापासून यावलकडे येतांना वाघळूद गावाजवळ पाटचारी आहे. या पाटचारीजवळ यावलकडून भुसावळकडे कार (क्रमांक एम. एच.19 इ. जी. 2786) जात असताना भुसावळकडून यावलकडे मिनिडोअर (क्रमांक एम.एच. 19 जे. 8573) येत होती. या दोन्ही वाहनांचा अपघात घडला. या अपघातामध्ये नरेंद्र प्रेमचंद पाटील, रागिणी नरेंद्र पाटील, माधुरी गोकुळ पाटील, भावना नंदकिशोर पाटील (चौघे राहणार सावखेडासीम, ता.यावल), दीपक पाटील व शिवांशू पाटील (दोघे राहणार यावल) आणि मिनीडोर चालक असे सात जण जखमी झाले. जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने काहींना यावल ग्रामीण रुग्णालय तर काहींना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !