भुसावळात फळ विक्रेत्यांकडे भरदिवसा पावणेदोन लाखांची घरफोडी
Fruit vendors in Bhusawal robbed of Rs. 2.5 lakh in broad daylight भुसावळ (12 फेब्रुवारी 2025) घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी एक लाख 72 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लांबवली. ही घटना पाटीलवाडा परिसरात सोमवारी दुपारी उघडकीस आली. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
इब्राहिम इलियास बागवान (30, रा. मुंजोबा मंदिराजवळ, पाटीलवाडा, भुसावळ) हे तरुण कुटुंबासह वास्तव्याला असून फळ विक्री करून उदरनिर्वाह करतो. सोमवारी दुपारी 2.30 वाजता त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील लोखंडी कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि 28 हजार रुपयांची रोकड मिळून एक लाख 72 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवण्यात आले. इब्राहिम बागवान घरी आल्यानंतर त्यांनी घरफोडीचा प्रकार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात कळवला. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.







