टोळ्या पुन्हा सक्रिय : स्वस्तात डॉलरच्या बहाण्याने मधापुरी जंगलात नेत साडेचार लाखांचा ऐवज लूटला
Under the pretext of cheap dollars, they took him to the Madhapuri forest and looted property worth Rs. 4.5 lakhs. मुक्ताईनगर (12 फेब्रुवारी 2025) :मुंबईतील युवकांना स्वस्तात डॉलर देण्याच्या बहाण्याने बोलावत मारहाण करून लुटण्यात आले. ही घटना 10 रोजी घडली. या परिसरात पुन्हा टोळ्या सक्रिय झाल्या असून पोलिसांनी दखल घेण्याची अपेक्षा आहे. सात आरोपींनी चार लाख 41 हजारांचा मुद्देमाल लूटल्याचे तक्रारीत नमूद आहे.
काय घडले नेमके
तक्रारदार हर्ष प्रमोद पाटील (21, नालासोपारा पश्चिम, जि.ठाणे) याने मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या सोबतच मॅक्सवेल जॉन डायस आणि मनीष सिंग यांना सात अज्ञात व्यक्तींनी एक लाख रुपयांच्या मोबदल्यात चार हजार डॉलर देण्याचे सांगितले होते व ठरल्याप्रमाणे तक्रारदार आल्यानंतर संशयीतांनी त्यांना मधापुरीच्या जंगलात नेले व प्लास्टिकच्या पाईपने व लाकडी काठ्यांनी मारहाण करून मारून टाकण्याची धमकी देत त्यांच्याकडून मोबाइल आणि इतर वस्तू हिसकावल्या. हर्षच्या खात्यातून एक लाख 41 हजार, मॅक्सवेलकडून सात हजार रोख, सोन्याची दहा ग्रॅमची साखळी, तीन ग्रॅमचे कानातले, मोबाईल, घड्याळ असा चार लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहेत.








