दीपनगरातील बी.टी.पी.एस.प्रोजेक्टमधून 69 लाखांचे कॉपर बार लांबवले : गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश


भुसावळ (13 फेब्रुवारी 2025) : दीपनगर प्रकल्पातील बी.टी.पी.एस. प्रोजेक्ट येथून के.एस.एल.टेक्नोक्रॅटस कंपनीच्या मालकिचे 68 लाख 86 हजार 758 रुपये किंमतीचे कॉपर बस बार लांबवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांकडे दाद मागितल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकांचा 24 तास खडा पहारा या प्रकल्पात आहे शिवाय अवजड बार नेण्यासाठी ट्रकसारख्या मोठ्या वाहनाची आवश्यकता असल्याने ही चोरी झाली कशी ? शिवाय यात कोण-कोण सहभागी आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुरक्षा रक्षक असतानाही चोरी झाल्याने आश्चर्य
दीपनगर येथील बी.टी.पी.एस. प्रोजेक्ट येथून के.एस.एल.टेक्नोक्रॅटस या कंपनीने मौल्यवान ईलेक्ट्रीक पॅनल्स, ट्रान्सफार्मरची उभारणी व कमीशनींगचे काम सुरू असताना 30 मार्च 2023 ते 18 जानेवारी 2024 दरम्यान बी.टी.पी.एस. प्रोजेक्टमधून 68 लाख 86 हजार 758 रुपये किंमतीचे कॉपर बस बार अज्ञात चोरट्यांनी लांबवले. के.एस.एल.टेक्नोक्रॅटस, तेलंगना या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रावुला राजेंद्र प्रसाद इसराईल (आंध्रप्रदेश) यांनी भुसावळ येथील मे. ज्युडी मॅजी वर्ग-1 यांच्या न्यायासनापुढे भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात संदर्भात अर्ज दाखल केला. 7 जानेवारी भुसावळ येथील मे. ज्युडी मॅजी वर्ग 1 यांच्या न्यायासनाने भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. तक्रारदारातर्फे अ‍ॅड.राजेंद्र टी. राय (भुसावळ) यांनी काम पाहिले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !