दीपनगर प्रकल्पातून 66 हजारांची तांब्याची तार लांबवली : एका आरोपीला अटक
भुसावळ (13 फेब्रुवारी 2025) : दीपनगर विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणी विभागातून चोरट्यांनी 66 हजार रुपये किंमतीची तांब्याची तार लांबवली. ही घटना 10 रोजी रात्री 10.20 वाजता समोर आली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयीताला अटक करण्यात आली.
एका आरोपीला अटक
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी अर्जुन मच्छिंद्र महाजन (34, दीपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवार, 10 रोजी रात्री 10.20 वाजता दीपनगर प्रकल्पातील कोळसा हाताळणी विभागातील लोकोशेडच्या आवारातून 110 किलो वजनाची व 66 हजार रुपये किंमतीची तांब्याची तार तीन ते चार चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल होताच मोहन पंडित निकम (26, पिंप्रीसेकम, ता.भुसावळ) यास अटक करण्यात आली तर अन्य तीन संशयीतांचा कसून शोध सुरू आहे. तपास हवालदार योगेश पालवे करीत आहेत.








