भुसावळात फळ विक्रेत्याकडे धाडसी घरफोडी : 24 तासात आरोपी जाळ्यात

पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त : भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई


भुसावळ (13 फेब्रुवारी 2025) : बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील पाटीलमळा भागातील फळ विक्रेत्याकडे चोरट्याने भर दिवसा घरफोडी करीत 28 हजारांच्या रोकडसह एक लाख 44 हजारांचे दागिने लांबवले होते. सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजेदरम्यान हा प्रकार समोर आला होता तर भर दिवसा झालेल्या धाडसी घरफोडीमुळे नागरिकही धास्तावले होते. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात घरफोडीची उकल करीत आरोपी रिजवान फकीरा बागवान (38, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यास अटक केली. आरोपीकडून एक लाख 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमालम जप्त करण्यात आला.

कुटूंब लग्नाला जाताच साधली संधी
इब्राहिम इलियास बागवान (30, रा. मुंजोबा मंदिराजवळ, पाटीलवाडा, भुसावळ) यांच्या नातेवाईकांचे लग्न असल्याने ते कुटूंबातील सदस्यांसह गावातच सोमवारी दुपारी लग्नाला गेले. ही संधी साधून आरोपी रिजवान बागवानने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील लोखंडी कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि 28 हजार रुपयांची रोकड मिळून एक लाख 72 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. तक्रारदाराच्या पत्नीचा आरोपी हा दूरच्या नात्याने भाऊ असून त्याचे बागवान यांच्याकडे येणे-जाणे होते. पोलिसांच्या तपासात व सीसीटीव्हीतही ही बाब सप्ष्ट होताच संशय बळावला व आरोपीस पकडताच त्याने गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल काढून दिला.




यांनी केली कारवाई
ही कारवाई भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, एएसआय हसमत अली सैय्यद, हवालदार विजय बळीराम नेरकर, हवालदार रमण काशीनाथ सुरळकर, हवालदारमहेश एकनाथ चौधरी, कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह, कॉन्स्टेबल राहुल विनायक वानखेडे, कॉन्स्टेबल अमर सुरेश अढाळे, कॉन्स्टेबल प्रशांत रमेश परदेशी आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !