यावल बसस्थानकातून महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोन्याची पोत लांबवली
यावल (13 फेब्रुवारी 2025) : बसस्थानकावर प्रवासासाठी आलेल्या पारोळा येथील 55 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबवली. हा प्रकार सोमवारी घडल्यानंतर यावल पोलिसात बुधवारी अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल शहरातील बसस्थानकावर अंजली किशोर जैन (55, बालाजी मंदिराजवळ, पारोळा) या महिला प्रवासासाठी आल्या होत्या. त्या दहिगाव येथून यावल व यावल येथून पारोळा जाणार होत्या. गर्दीत एस.टी.त बसत असताना त्यांच्या गळ्यातील एक लाख 23 हजार 196 रुपये किंमतीची पोत अज्ञात चोरट्याने चोरी केली. अंजली जैन यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.








