भुसावळातील कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये रेल्वे गाडीला अपघात होतो तेव्हा…!

15 मिनिटात यंत्रणा अपघातस्थळी दाखल : सतर्कतेत रेल्वे अधिकारी पास


भुसावळ (14 फेब्रुवारी 2025) : भुसावळहून खंडव्याकडे निघालेल्या एक्स्प्रेसला कोचिंग कॉम्प्लेक्सला अपघात घडला असून अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी सकाळी 11.50 वाजता कळवताच धोक्याचे सायरन (हूटर) वाजवण्यात आले व मोठा अपघात झाल्याचे गृहीत धरून रेल्वेतील अधिकारी व कर्मचारी तत्परतेने कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये दाखल झाले. यावेळी दोन डबे एकमेकांवर आदळल्यानंतर प्रवासी मदतीच्या धावा करीत असताना यंत्रणेने तातडीने त्यांना अत्याधूनिक क्रेनचा वापर करीत उपचारार्थ हलवले. अर्थात हा सर्व भाग मॉकड्रीलचा होता व या सतर्कते यंत्रणा पास झाल्याचे निरीक्षण डीआरएम ईती पाण्डेय यांनी केले. एनडीआरएफ आणि रेल्वे प्रशासनाकडून या मॉक ड्रीलचे नियोजन करण्यात आले.

15 मिनिटात यंत्रणा दाखल
रेल्वेच्या धोका दर्शविणारा सायरन गुरुवारी 11.50 वाजता रेल्वे प्रशासनाने वाजवताच यंत्रणेतील अधिकार्‍यांनी कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये अपघात झाल्याचे कळताच अधिकारी व कर्मचारी रेल्वे साधनांद्वारे दाखल झाले. दोन डब्यातील प्रवासी मदतीची याचना करीत असताना तातडीने त्यांना बाहेर काढण्यात आले व नंतर मॉकड्रीलमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स यांनी अपघातग्रस्त प्रवाशांची सुटका करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांना वैद्यकीय मदत देण्यासाठी विभागावर कार्यरत कर्मचार्‍यांनी मदत केली. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, रुग्णवाहिका, आपत्कालीन गाडी, जॅकेट घातलेले कर्मचारी, क्रेन, डबा कापण्यासाठी गॅस वेल्डींगची मदत घेतली. मॉकड्रील पाहण्यासाठी शहरातील नागरिक जमले होते.




गाड्यांच्या सायरनचे आवाज
अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना राहुटीत नेत त्यांच्यावर वैद्यकीय पथकाद्वारे उपचार झाले तर गर्दी होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, लोहमार्ग पोलीस, जळगाव येथील पोलिसांच्या क्यूआरटी पथकासह कमांडो पथक, शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
डीआरएम ईति पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले. यावेळी एडीआरएफ पथकाचे नागपूर येथील अधिकारी, एडीआरएम, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त, संरक्षा अधिकारी, डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स नागपूर,आरपीएफ, रेल्वे हॉस्पीटलचे वैद्यकीय पथक आणि अपघात निवारण गाडीतील कर्मचारी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !