अट्रावलच्या गावातील प्रवेशद्वाराजवळून मोटरसायकल चोरी


यावल (14 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील अट्रावल गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कमानच्या बाजूला लावलेली मोटरसायकल लांबवण्यात आली. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अट्रावल गावात जातांना प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारच्या कमानजवळ धनराज किसन धुमाळ (चिंचोली, ता.जळगाव) यांनी आपली मोटरसायकल क्रमांक (एम.एच. 19 डी.जे. 5490) ही लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ही मोटरसायकल लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी त्यांनी मोटरसायकल सर्वत्र शोध घेतला मात्र, मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश महाजन करीत आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !