यावल-फैजपूर रस्त्यावर वाळू चोरी करून नेतांना वाहन पकडले
यावल (14 फेब्रुवारी 2025) : यावल ते फैजपूर रस्त्यावर यावल शहराबाहेर एका टाटा कंपनीच्या 407 वाहनाद्वारे एक जण अवैधरित्या वाळू वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन पकडले. वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध वाळू वाहतूक कायम
यावल-फैजपूर रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर टाटा कंपनीचे 407 वाहन (क्रमांक एम.एच.04 बी.यु.1135) यामध्ये मयूर उर्फ बिरबल पद्माकर कोळी हा तरुण वाळू चोरी करून नेत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले. वाहन, वाळू असा एकूण तीन लाख आठ हजारारचा मुद्देमाल जप्त करीत यावल पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार बबन पाटील यांच्या फिर्यादीवरून मयूर उर्फ बिरबल कोळी याच्याविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.








