यावल तालुक्यात अल्पवयीन बालविवाहानंतर गर्भवती : पतीसह चौघांविरोधात गुन्हा
यावल (14 फेब्रुवारी 2025) : अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्यानंतर पीडीतेशी संबंध ठेवल्यानंतर पीडीता गर्भवती राहिली व वैद्यकीय तपासणीत हा प्रकार समोर आल्यानंतर पतीसह सासु, सासु व पिडीतेच्या आई-वडिलांविरोधात आटपाडी, जि.सांगली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व कार्यक्षेत्र यावल तालुका असल्याने तपासार्थ हा गुन्हा यावल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
असे आहे प्रकरण
आधी यावल तालुक्यात रहिवासी करणार्या व हल्ली सांगली जिल्ह्यात रहिवासी करणार्या पीडीतेच्या कुटूंबियांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला व त्यानंतर पतीने शारीरीक संबंध ठेवल्यानंतर पीडीता गर्भवती राहिली. वैद्यकीय तपासणीत हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीचा नवरा, सासरा, सासू आणि आई यांच्या विरोधात आटपाडी येथे गुन्हा दाखल करून तो यावल पोलिसांकडे ऑनलाईन वर्ग करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.








