दीपनगर प्रकल्पाचा रस्ता अडवून आंदोलन : भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंसह पाच जणांविरूध्द गुन्हा
Protest by blocking the road to Deepnagar project: Case filed against five people including former BJP mayor Sunil Kale भुसावळ (16 फेब्रुवारी 2025) : दीपनगरातील प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे वरणगाव शहराध्यक्ष निलेश उर्फ नाना चौधरी, सचिव मयुर शेळके, महेद्र पाटील, भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, योगेश माळी (रा.वरणगाव) यांच्यासह 30 ते 35 जणांनी एकत्र येत अनधिकृतपणे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याने त्यांच्याविरूध्द भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण
दीपनगर प्रकल्पासमोर सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष चौधरी, सुनील काळेंसह सुमारे 35 जणांनी शुक्रवार, 14 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर सुशिक्षीत बेरोजगार संघटनेचे शहराध्यक्ष निलेश उर्फ नाना चौधरी, सचिव मयुर शेळके, महेंद्र पाटील, भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, योगेश माळी (रा.वरणगाव) यांच्यासह 30 ते 35 जणांनी एकत्र येत अनधिकृतपणे प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश केला. शासकीय कामात अडथळा आणला, प्रवेशद्वारामधून येणार्या जाणार्यांचा संपूर्ण मार्ग बंद केला. यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांना सुध्दा आत-बाहेर जावू न देता शासकीय यंत्रणेस वेठीस धरले. मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांच्याजवळील डिझेलची बाटली काढून त्यांचे अंगावर ओतून घेऊन त्यांनी स्वत:ला जाळून घेण्याची धमकी दिली. यावरून सुरक्षा कनिष्ठ अधिकारी स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.

