शिंदी येथे महिलेचा विनयभंग
न्यूज नेटवर्क । भुसावळ (16 फेब्रुवारी 2025) : भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे 21 वर्षीय महिलेचा अश्लील ईशारे करून विनयभंग करण्यात आला. ही घटना 10 रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी संशयीत मतीन हसन रिचवाले (शिंदी, ता.भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवार, 10 रोजी सायंकाळी पीडीत घराबाहेर उभी असताना संशयीताने अश्लील इशारे करीत मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. पीडीतेने तालुका पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक नंदकिशोर काळे करीत आहेत.








