मुक्ताईनगरात भांडे व्यापार्‍याची धूम स्टाईल पावणेदोन लाखांची रोकड लांबवली


मुक्ताईनगर (17 फेब्रुवारी 2025) : बँकेत रक्कम डिपॉझिट करण्यासाठी गेलेल्या व्यापार्‍याकडील सुमारे पावणेदोन लाखांची रोकड भामट्यांनी धूम स्टाईल लांबवली. शहरातील गीतांजली वाईन्सकडील अलीकडील रस्त्यावर ही घटना शनिवार, 15 रोजी सकाळी 11 वाजता घडली. भर दिवसा घडलेल्या या प्रकारानंतर व्यापार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले मुक्ताईनगरात
अफजल अब्दुल फारूक (42, तमिळनाडू, ह.मु.पगारीणबाई निवास, हॉटेल गीतांजलीमागे, मुक्ताईनगर) यांचा भांडे विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी बँकेत भरणा करण्यासाठी ते दुचाकीवरून आयसीआयसीआय बँकेत आले मात्र काहीतरी घरी राहिल्याचे आठवल्यानंतर ते पुन्हा दुचाकीने घराकडे निघाले असता घराजवळील मुक्ताईनगर-कोथळी रस्त्यावरील हॉटेल गीतांजवळ विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या अज्ञात दोघांनी फारूक यांच्याकडील रोकड असलेली बॅग लांबवली.




काही कळण्याआत हवेच्या वेगात संशयीत पसार झाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास हवालदार महेंद्र सुरवाडे करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !