सरपंच हत्या प्रकरणात वाल्मीक कराईडच मास्टरमाईंड
Valmik Karide is the mastermind in the Sarpanch murder case बीड (2 मार्च 2025) : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दखल केले असून त्यात वाल्मिक कराड हा या हत्येचा प्रमुख सूत्रधार असल्याचे नमूद केले आहे तर दुसर्या क्रमांकावर आरोपी विष्णू चाटेचा उल्लेख आहे.
या कारणास्तव सरपंच देशमुख यांची हत्या
सीआयडच्या तपासात अवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली व संतोष देशमुख यांनी याला ठाम विरोध केल्याने त्यांची हत्या करण्यात आली, असे आरोपपत्रात नमूद आहे. 29 नोव्हेंबर रोजी सुदर्शन नावाच्या व्यक्तीच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणीची मागणी केली होती तसेच 6 डिसेंबरला संतोष देशमुख, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्यात जोरदार वाद झाला. सीआयडीने आरोपपत्रात या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे.

या हत्येच्या तपासात पाच साक्षीदारांनी महत्त्वपूर्ण जबाब नोंदवले असून, त्यामध्ये वाल्मिक कराड विरुद्ध ठोस पुरावे समोर आले आहेत. बीड शहरात कराडची दहशत असल्याचेही आरोपपत्रात नमूद केले आहे.
