बॅटरी कंपनीत चोरी : तांबापुर्‍यातील टोळी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : जळगाव एमआयडीसी परिसरातील ई सेक्टरमधील श्री आनंद बॅटरी कंपनीत झालेल्या चोरी प्रकरणी शहरातील तांबापुरा भागातील सहा संशयीतांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 97 हजार हजार 500 रुपये किंमतीच्या शिसे धातूच्या विटा व 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून एक लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
लखन वासुदेव बुधवानी (कंवर नगर, जळगाव) यांच्या मालकीची जळगावातील एमआयडीसी परिसरात श्री आनंद बॅटरी कंपनी आहे. 31 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेपासून 1 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या सिमेंट कंपाऊंडची जाळी तोडून एक लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 500 किलो वजनाच्या शिशाच्या 20 धातूच्या विटा चोरल्या व एम.आय.डी.सी.पोलिसात गुन्हा दाखल होताच तपासचक्रे फिरवण्यात आली.

स्थानिक टोळीला पोलिसांकडून अटक
पोलिसांनी आसीफ शहा सिकंदर शहा व मोहसीन शाह सिकंदर शाह (फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव), महेश उर्फ बापू संतोष भोई (बिस्मिला चौकीजवळ, तांबापुरा, जळगाव), मुकेश राजू परमार (गौतम नगर, तांबापुरा, जळगाव), शेख आबीद शेख मोहम्मद (फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव) व शकील शहा रुबाब शहा (बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) यांना अटक करताच त्यांनी चोरीची कबुली देत. 97 हजार 500 रुपये किंमतीच्या शिशाच्या 16 धातूच्या विटा व 30 हजार रुपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, गिरीश पाटील, प्रमोद लाडवंजारी, रामकृष्ण पाटील, किरण चौधरी, मोतीलाल बोरसे, शशिकांत मराठे, रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने उघडकीस आणला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !