भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भुसावळ (31 मार्च 2025) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, भुसावळ तसेच केएनसीटीआय या दोन्ही संस्थांचे माजी अध्यक्ष, सर्वांचे आधारस्तंभ स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांच्याहस्ते माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, एस.पी.पाठक तसेच विद्यालयातील सकाळ आणि दुपार शाखेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संगणक विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. प्रसंगी मनोज कुलकर्णी यांनी स्वर्गीय दादासाहेब एन. के. नारखेडे यांच्या कार्यकर्तृत्वास उजाळा दिला.

