चेट्रीचंड शोभायात्रेने वेधले भुसावळकरांचे लक्ष

भगवान झुलेलाल यांचा जन्मोत्सव उत्साहात : युवकांचे ठेक्यावर थिरकले पाऊले


भुसावळ (31 मार्च 2025) : सिंधी समाजाचे दैवत असलेल्या भगवान झुलेलाल यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंधी कॉलनीमधून रविवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने भुसावळकरांचे लक्ष वेधले. डीजेच्या तालावर युवकांनी ठेका धरला. यावेळी शोभायात्रेत सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त सिंधी समाजबांधव सहभागी झाले. युवक-युवतींचा शोभायात्रेत मोठा सहभाग होता.

समाजबांधवांनी काढली दुचाकी रॅली
सिधी समाजातर्फे चेट्रीचंड उत्सवाचे आयाोजन केले होते. याच पार्श्वभुमीवर रविवारी सकाळी आठ वाजता सिंधी समाजबांधवांनी दुचाकी रॅली काढली होती. ही रॅली शहरातील सिंधी कॉलनीतून सुरू होऊन जामनेर रोड, ब्राम्हण संघ, नृसिंह मंदिर, अप्सरा चौक, मरीमाता मंदीर, सराफ बाजार, गांधी चौक, मॉडर्न रोड, बाजारपेठ पोलीस ठाणे, पांडुरंग टॉकीज, वाल्मीक नगर परत जामनेर रोड या मार्गाने नाहाटा चौफुलीजवळ जाऊन तेथून सिंधी कॉलनीत रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत सुमारे 600 पेक्षा जास्त दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला होता. रविवारी दुपारी 12 वाजता शहरातील सिंधी कॉलनीमधून झुलेलाल मंदीरापासून शोभायात्रेला सुरूवात झाली. समितीचे अध्यक्ष जयपाल रोहेडा यांच्याहस्ते भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंदीरात मोठ्या प्रमाणावर समाजबांधवांची उपस्थिती होती. शोभायात्रेत चार हजारापेक्षा जास्त समाज बांधवांची उपस्थिती होती. डीजेच्या तालावर युवक, युवती नाचत होते. यावेळी मनोहर सोडाई, माजी नगरसेवक निकी बतरा, अ‍ॅड.मनीष सेवलानी, भारतीय सिंधू सभेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश दुधानी, नारायणदास छाबडीया आदी समाजबांधव उपस्थित होते. स्व.मिरादेवी झुलेलाल मंदिर येथेही पूजा होऊन रात्री भंडार्‍याचे आयोजन अनिल डुबा यांनी केले. सनमुखदास मनवानी, जय राम मुलचंदानी, गोपाल कमनानी, अनिल बजाज, अमर बजाज यांनी सहकार्य केले.


समाज बांधवांनी दुकाने ठेवली बंद
चेट्रीचंड उत्सवामुळे सिंधी समाज बांधवांचे शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली. गुढीपाडवा असताना सुध्दा समाजबांधवांनी दुकाने बंद ठेवत दुचाकी रॅली तसेच शोभायात्रेत सहभाग घेतला. दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता.

शोभायात्रेचा असा होता मार्ग
सिंधी कॉलनीपासून दुपारी 12 वाजता प्रारंभ झालेली मिरवणूक जामनेर रोडने अष्टभुजा देवीच्या मंदिरावरून जात ब्राम्हण संघ, भारत मेडिकल, डिस्को टॉवर, अप्सरा चौक, मरीमाता मंदीर, सराफ बाजार, मॉडर्न रोड, लक्ष्मी चौक येथून रेल्वे स्थानकाजवळ मिरवणुकीचा समारोप झाला मात्र पूजेची सांगता करण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाणे, हंबर्डीकर चौक, शहर पोलीस ठाण्यावरून गांधी पुतळा, यावल रोडने तापी नदीवर रात्री सांगता झाली.

ठिकठिकाणी शरबत वाटप
मिरवणुकीच्या मार्गावर 25 पेक्षा जास्त ठिकाणी शरबत, खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी याचा लाभ घेतला. काही स्टॉलवर सकाळपासून सरबत वाटप सुरू होते. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे शरबत पिण्यावर भर होता. माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांच्यासह अनेक जणांनी कुल्फी वाटप केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !