भुसावळातील भोळे महाविद्यालयात वार्षिक पारितोषीक उत्साहात


भुसावळ (1 एप्रिल 2025) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 2024-25 मधील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर उपक्रमातील गुणवंतप्राप्त विद्यार्थ्यांना गुरुवार, 27 मार्च 2025 रोजी सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्र-कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे, प्रभारी अधिष्ठाता, सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.साहेबराव भुकन यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा पारितोषिकाने गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक होते.समिती प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.


अपयशाने खचून जावू नका  : इंगळे
प्र.कुलगुरू डॉ.एस.टी.इंगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व सातत्य ठेवल्याने यश मिळते. अपयशाने खचून न जाता अपयश पचवण्यासाठी शक्ती वाढवावी त्यातूनच पुढे यश मिळते. एनईपी 2020 नुसार विद्यापीठाने या वर्षापासून क्रीडा व संस्कृतिक विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करून मुख्य प्रवाहात आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सर्वांनी व्यक्तिमत्व विकास करिता सर्व उपक्रमात सहभागी व्हावे.

विद्यार्थ्यांनी कृतीशील व्हावे
प्रा.डॉ.साहेबराव भुकन म्हणाले की, शिक्षणाबरोबर विद्यार्थांनी कृतिशील असायला हवे. सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांचा आदर्श ठेवल्यास चालना मिळते, अभ्यासासोबत इतर कौशल्य आत्मसात करावे तसेच विविध उपक्रमात सहभागी व्हावे.

प्राचार्य डॉ.राजू फालक म्हणाले की, विद्यार्थ्याने एक तरी चांगले काम केल्यास त्याच्या संबंधित सर्वांचा विकास होतो. सतत प्रयत्नाने यश मिळते त्यामुळे पारितोषीक मिळविण्यास मदत होते त्यामुळेच आपण सर्व येथे उपस्थित आहात. विद्यापीठ कॉपीमुक्त अभियान राबवित आहे. पुढील वर्गात प्रवेश पाहिजे असल्यास परीक्षा पास होणे आवश्यक आहे त्यामुळे पुन्हा पारितोषिक मिळेल, ज्यांना पारितोषिक मिळाले त्यांचे अभिनंदन करतो ज्यांना मिळाले नाही त्यांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
प्रास्ताविक प्रा.डॉ.जयश्री सरोदे तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.डी.एस.राणे तर आभार प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.जागृती सरोदे, गायत्री नेमाडे, प्रा.सुशीला भाटे, प्रा.ऐश्वर्या वासकर, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.संजय बाविस्कर, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.अंजली पाटील, किरण पाटील, प्रमोद नारखेडे, सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर यांनी परिश्रम घेतल्याचे समिती प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !