रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : बिलासपूर विभागात रेल्वेचा ब्लॉक, भुसावळ विभागातून धावणार्या 22 रेल्वे गाड्या रद्द
प्रवाशांची पुन्हा गैरसोय : वेळापत्रक पाहून प्रवासाला निघण्याचे आवाहन
भुसावळ (2 एप्रिल 2025) : भारतीय रेल्वेतील बिलासपूर विभागातील कोतरलिया स्थानकावर चौथ्या मार्गाला कनेक्टिव्हिटी जोडण्याचे काम केले जात असल्याने रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणार्या तब्बल 22 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे हमसफर, भुवनेश्वर, हावडा, शालिमार यासह 22 रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
22 प्रवासी गाड्या रद्द
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमधील बिलासपूर विभागातील रायगढ़ ते झारसुगुडा खंड दरम्यान कोतरलिया स्थानकावर चौथ्या मार्गाला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पूर्व-नॉन इंटरलॉकिंग, नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येत आहे. या कामासाठी भुसावळ विभागातून धावणार्या 22 प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गाड्या रद्द झाल्याने आणि अनेक प्रवाशांनी दोन महिने अगोदरच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या गाड्या झाल्या रद्द
गाडी 20822 सांत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस 12 व 19 एप्रिलला रद्द तर गाडी 20821 पुणे-सांत्रागाची हमसफर एक्सप्रेस 14 व 21 रोजी रद्द, गाडी 12880 भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस 10 ते 21 एप्रिलपर्यत रद्द, गाडी 12879 लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर साप्ताहिक एक्सप्रेस 12 ते 23 पर्यंत रद्द, गाडी 12870 हावडा-मुंबई साप्ताहिक एक्सप्रेस 11 आणि 18 एप्रिलला रद्द, गाडी 12869 मुंबई-हावडा साप्ताहिक एक्सप्रेस 13 व 20 रोजी रद्द, गाडी 12151 लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार समरसता द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस 9 ते 17 एप्रिलला रद्द, गाडी 12152 शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास 11 ते 19 रद्द, गाडी 22894 हावडा-साई नगर शिर्डी साप्ताहिक एक्सप्रेस 10 व 17 रोजी रद्द, गाडी 22893 साई नगर शिर्डी -हावडा साप्ताहिक एक्सप्रेस 12 व 19 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी 12812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दि. 11 ते 19 रद्द, गाडी क्रमांक 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया द्वि -साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी 13 ते 21 रद्द, गाडी 12129 पुणे-हावडा एक्सप्रेस ही गाडी 11 ते 24 रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 12130 हावडा-पुणे एक्सप्रेस ही गाडी 11 ते 24 पर्यत रद्द, गाडी 12859 मुंबई-हावडा एक्सप्रेस ही गाडी 13 ते 26 पर्यंत रद्द, गाडी 12860 हावडा -मुंबई एक्सप्रेस 11 ते 24 पर्यंत रद्द, गाडी 12222 हावडा-पुणे द्वि साप्ताहिक दुरांतो एक्सप्रेस 10 ते 19 पर्यंत रद्द, गाडी 12221 पुणे-हावडा द्वि साप्ताहिक दुरांतो एक्सप्रेस 12 ते 21 पर्यंत रद्द, गाडी 12905 पोरबंदर-शालिमार द्वि साप्ताहिक एक्सप्रेस 9 ते 17 पर्यत रद्द, गाडी 12906 शालिमार -पोरबंदर द्वि साप्ताहिक एक्सप्रेस 11 ते 19 पर्यंत रद्द, गाडी 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस 11 ते 22 पर्यत रद्द, गाडी 12102 शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 13 ते 24 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये सुलभता आणि वेळेची बचत होईल. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




