चाळीसगावनजीक भरधाव फॉर्च्युनरच्या धडकेने पाच वर्षीय बालक ठार

नव्या कारचे नुकसान : महिलाही जखमी : उत्तमराव महाजनांविरोधात गुन्हा


चाळीसगाव  (2 एप्रिल 2025)  : भरधाव फॉर्च्युनर कारने नव्या कोर्‍या टाटा नेक्सान कारला धडक दिल्याने पाच वर्षीय बालकाचा गाडी बाहेर पडल्याने जागीच मृत्यू झाला तर गाडीतील विवाहिता जखमी झाली. हा अपघात चाळीसगाव-धुळे महामार्गावरील पुन्शी खडी क्रशर प्लॉटपुढे 1 रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडला. देवांश दिनेश महाजन (5, टीटवाळा, पूर्व कल्याण) असे मयताचे नाव आहे.

डॉ.उत्तमराव महाजनांविरोधात गुन्हा
दिनेश देवराम महाजन (45, टीटवाळा पूर्व कल्याण) यांनी दोन दिवसांपूर्वी नवी टाटा नेक्सॉन कार घेतल्यानंतर कामानिमित्त ते पत्नी व मुलांसह धुळे येथे गेले होते व परतीच्या प्रवासात त्यांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या फॉर्च्यूनर (एम.एच. 18 बी.एक्स.0011) ने जबर धडक दिल्यानंतर कारमधील पाच वर्षीय देवांश हा गाडीबाहेर फेकला जावून मयत झाला तर गाडीमधील स्वाती दिनेश महाजन यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ गंभीर दुखापत झाली तसेच नव्या कोर्‍या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.


अपघाताची माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुले व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळाल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी गेले. जखमींना उपचारार्थ ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनेश महाजन यांच्या फिर्यादीवरून डॉ.उत्तमराव महाजनांविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !