जळगावात दुचाकी चोरटे सैराट : पुन्हा व्यावसायिकाची दुचाकी लांबविली


जळगाव (2 एप्रिल 2025) : जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच आहेत. इच्छादेवी चौकानजीक सेवामंडल मंदिराच्या गेटजवळ कापड व्यावसायिकाने लावलेली सुमारे 80 हजार रुपये किमतीची होण्डा सीबीझेड (एमएच 19- व्हीए 3214) दुचाकी चोरट्याने चोरून नेली.

रविवारी (30 मार्च) रात्री नऊ ते नऊ वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली. यश मनोहरलाल अहुजा (वय 27, केमिस्ट भवन, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (31 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विकास सातदिवे हे करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !