पत्नीपासून लांब रहा म्हटल्याच्या रागातून व्यावसायीकाला मारहाण


जळगाव (2 एप्रिल 2025) : पत्नीसोबत काय करतो, तिच्यापासून लांब राहा, अशी समज दिल्याचा राग आल्याने संशयिताने 38 वर्षीय व्यावसायिकाला शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. डोळ्याच्या भुवईच्यावर तसेच नाकाला दगड मारून दुखापत केली. शनिवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना व. वा. वाचनालयाच्या गल्लीत रस्त्यावर घडली.

या प्रकरणी तक्रारीनुसार संशयित गौरव अनिल चौधरी याच्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार पंकज सपकाळे हे तपास करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !