अजित पवार गटातील पदाधिकार्‍याविरोधात बलात्काराचा गुन्हा


Shantanu Kukde पुणे (2 एप्रिल 2025) : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

समर्थ पोलीस ठाण्यात पीडीतेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांकडून शंतनु कुकडेला अटक करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. या घटनेनंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कुकडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.


शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शंतनु कुकडे यांच्यावर धर्मांतरासंबंधी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कुकडे यांना पक्षातून तातडीने हटवण्याची मागणी फेसबुक पोस्ट शेअर करत केली आहे.

पुण्यात एका बंगल्यात तो डान्सबार चालवत असल्याचा धक्कादायक प्रकारही सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून शंतनू कुकडेवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !