उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ; कार्यकर्त्यांनो स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज व्हा


कोल्हापूर (7 एप्रिल 2025) : शिंदेसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा सत्तेचा पाया असल्याचेही ते म्हणाले आहेत.

विरोधकांनी कितीही खोडा घातला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथे शिंदेसेनेच्या वतीने आभार यात्रा सभेत ते बोलत होते. सभेला राधानगरीसह भुदरगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील लोकांची अलोट गर्दी उसळली. आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित कदम, आदी प्रमुख उपस्थित होते.


एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यातील विकासप्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख योजना सुरू केल्या. त्यामुळे विधानसभेला जनतेने भरभरून आशीर्वाद दिले. अडीच वर्षांत मी साडेचारशे कोटी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिले. महाविकास आघाडीने अवघे अडीच कोटी दिले. आम्ही कोणत्या धर्माचा द्वेष करीत नाही. जो देशाच्या विरोधात आहे, त्याला विरोध करणार. मात्र, मातीशी इमान राखतील त्यांच्याबरोबर आम्ही आहोत.

पालकमंत्री आबीटकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर सर्वसामान्य माणसाला न्याय दिला. अनेक लोकांची टीका होत असतानाही त्यांनी कामांमधून उत्तर दिले. कोल्हापूर सर्किट बेंच, विमानतळ, अंबाबाई, जोतिबा विकास आराखडा याला गती देण्यासाठी आपले सहकार्य हवे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !