भुसावळात भाजपा अनु.जाती मोर्चा व सर्व शक्ती सेनेतर्फे रामनवमी उत्साहात
Ram Navami celebrations in Bhusawal by BJP’s Anu.Jati Morcha and Sarva Shakti Sena भुसावळ (7 एप्रिल 2025) : शहरात अँटी करप्शन मानव अधिकार, भाजपा अनु.जाती मोर्चा व सर्व क्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
एकवचनी राम : प्रा.संजय मोरे
प्रथम भगवान श्रीराम प्रभू यांच्या पुर्णाकृती प्रतिमेला प्रा.संजय मोरे यांनी पुष्पहार अर्पण करीत महाआरती केली. त्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. प्रा.संजय मोरे म्हणाले की, प्रभु श्रीराम यांचा जन्म अयोध्या येथे चैत्रमास शुक्ल पक्ष नवमी ई. स. 5114 पुर्व 10 जानेवारी दुपारी 12 वाजुन 05 वाजता झाला. श्री श्रीराम प्रभु यांना वेगवेगल्या नावाने संबोधण्यात आले आहे. श्रीराम प्रभु एक वचणी होते. आपल्या वडिलांच्या आज्ञाचे पालन करत वयाच्या 27 व्या वर्षी 14 वर्षाचा वनवास पुर्ण केल्यानंतर ते वयाच्या 41 व्या वर्षी ते आपल्या राज्यात परतले. कार्यक्रमाचे आयोजन मानव अधिकार अँटी करप्शन मानव अधिकार सर्वशक्ती महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले. मानव अधिकार युवक राज्य उपाध्यक्ष प्रशांत जाधव, माया मोरे, मानव अधिकार जिल्हा उपाध्यक्ष डॉ.धनराज बावस्कर, सर्व शक्ती सेना युवक राज्य उपाध्यक्ष गजानन कांडेले, मानव अधिकार युवक जिल्हाध्यक्ष सचिन सुरवाडे, सर्व शक्ती सेना जिल्हाध्यक्ष डॉ.संदीप बिसन गाढे, अध्यक्ष मयुर कोळी, सर्व शक्ती सेना युवक जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील तायडे, प्रा.अनिल सपकाळे, विकास सावळे, प्रा.योगीता सपकाळे, प्रा.संगीता, प्रा.स्नेहा सोनवणे, रंजना सावळे, संजय कोळी, विकास सावळे, शशिकांत कोळी, दीपक कोळी, मोहित कोळी, प्रकाश कोळीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

