प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने व्यास नगरी दुमदुमली
The city of Vyasa was filled with the shouts of praise of Lord Shri Ram यावल (7 एप्रिल 2025) : श्री राम, जय राम!, जय जय राम,!! अशा स्वरांनी रविवारी व्यास नगरी दुमदुमली. शहरातील सातोद रस्त्यावरील पेठेच्या श्रीराम मंदिर, महर्षी व्यास मदिरावरील श्री राम मंदिर व कोहळेश्वर श्रीराम मंदिरात जन्मोत्सवानिमित्त पूजारी मंडळीच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पध्दतीनेे पूजा झाली व पंजेरीचा प्रसाद वितरण करण्यात आला. सकाळपासूनच सर्व मंदिरात भाविक-भक्तांनी धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला व दर्शनार्थ दिवसभर ये- जा सुरू होती.
श्रीरामावर आधारीत भजनांचे सादरीकरण
शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्री शनी मंदिरातील पेठचे श्रीराम मंदिरात रविवारी सकाळ पासूनचं श्रीराम नामाच्या कीर्तनाने लक्ष वेधले. पारंपरिक पध्दतीने येथे रामदेव बाबा भजनी मंडळ, काळभैरव भजनी मंडळ, भोलेबाबा भजनी मंडळचे रूपचंदजी घारू, कमलाकर घारू, हेमराज घारू सह आदींनी प्रभू श्रीरामावर आधारीत भजन सादर केले. दुपारी 12 वाजता मंदिराचे पूजारी पप्पू महाराज जोशी यांच्याहस्ते मंदिरात शास्त्रोक्त पध्दतीने पूजा, आरती झाली. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पंजेरीचा प्रसाद भाविक-भक्तांमध्ये वितरण करण्यात आला.

कोहळेश्वर मंदिरात महाअभिषेक
शहरातील वाणी गल्लीतील श्री कोहळेश्वर श्रीराम मंदिरात पहाटे साडेपाच वाजता पुरोहित सारंग महाराज बाविसे व अतुल महाराज बाविसे यांच्या हस्ते विधीवत पूजा व सारंग बेहेडे, श्रृती बेहेडे, सुभोत बडछापे व नेहा बडझापे (रा.भुसावळ) यांच्याहस्ते महाअभिषेक करण्यात आला. दहा वाजता पाडळसा येथील हभप पूजाताई महाराज यांच्या किर्तनाला सुरुवात झाली. किर्तनाकरीता मंदिरात भाविक-भक्तांनी गर्दी केली. या कार्यक्रमात दिलीप वाणी, माजी नगरसेविका कल्पना वाणी, राजेश श्रावगीसह मान्यवरांची उपस्थिती होती. दुपारी बारा वाजता मोठ्या उत्साहात मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता संजय गडे, दिलीप गडे, मंदार गडे, मनोज करणकर, तुषार गडे, डॉ.निलेश गडे, प्रमोद गडे, जगदीश गडे, सारंग बेहेडे, राजेश श्रावगी, आशिष नेवे, नारायण खारे, तेजस गडे, अनिश बेहेडे यांनी परिश्रम घेतले. नगरसेविका कल्पना वाणी यांच्याहस्ते पूजा महाराज यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर कांचन पाठक यांनी आभार मानले.
श्री महर्षी व्यास मंदिर
श्री महर्षी व्यास मंदिरातील श्रीराम मंदिरात देखील श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथे बिल्लू महाराज, भुवन महाराज यांनी श्रीरामांचे पूजन करून आरती केली. या कार्यक्रमाला व्यासमंदिराचे सर्व संचालक मंडळ यात भागवत ढाके, रमेश बोंडे, अशोक बारी, गुरव अप्पा व व्यास नगरीतील भाविक उपस्थित होते. श्रीराम जन्मानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने संचित महाराज यांनी किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. ऐनवेळी श्री परमेश्वर महाराज आळंदी यांचा प्रवर्चना कार्यक्रम घेण्यात आला.






