जि.प.मुख्याधिकार्‍यांनी नागरिकांना भेटण्याची वेळ व दिवस वाढवून द्यावेत : भुसावळातील केदार सानप यांची मागणी


ZP chiefs should increase the time and days for meeting citizens : Demand of Kedar Sanap from Bhusawal भुसावळ (7 एप्रिल 2025) : शहरातील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जळगाव जिल्हा परिषद मुख्याधिकारी मीनल करनवाल यांची भेट घेवून त्यांना जिल्हाभरातून येणार्‍या नागरिकांना भेटीसाठी केवळ सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस ठरवून दिले आहेत मात्र या वेळेत येणार्‍या सर्व नागरिकांना आपले काम पूर्ण करता येत नाही अथवा भेटही होत नाही. याबाबत आठवड्याचे दिवस वाढवून देण्यात यावे, अशी विनंती सानप यांनी केली आहे.

तर नागरिकांची होईल सोय
सानप यांनी दिलेल्या विनंती अर्जात म्हटले आहे की, आपण जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी आठवड्याचे प्रत्येक सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ ठरवून दिला आहे. तथापी आपल्या भेटीसाठी नागरिक मोठ्या संख्येने व आशेने त्यांचे काम घेवून येतात मात्र बरेच नागरिक ते दूरच्या ठिकाणावरून आले असल्याने त्यांना रिकाम्या हाती परत जावे लागते. याकरिता आपण भेटीसाठी फक्त सोमवार व शुक्रवार ऐवजी आपण ज्या-ज्या वेळेस कार्यालयात असाल त्यावेळी नागरिकांना भेटीसाठी वेळ देण्यात यावा, अशी विनंती केली आहे. याबाबत आपण जी कारवाई कराल अथवा निर्णय घ्याल त्यांची एक प्रत माहितीस्तव सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांना देण्यात यावी, अशी विनंती वजा मागणी सानप यांनी केली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !