नंदुरबार शहरात पॉश बंगल्यात वेश्या व्यवसाय : बंगला मालकासह गुजरातच्या 11 आंबटशौकीन ग्राहकांना बेड्या


Prostitution business  नंदुरबार (7 एप्रिल 2025) : शहरातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील निझर रस्त्यावरील लाल-त्रिकोणी बंगल्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने उपनगर पोलिसांसह छापेमारी करीत बंगला मालकासह 11 ग्राहकांना बेड्या ठोकल्या तर देहव्यापार करणार्‍या चार महिलांची सुटका केली. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीटा अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

बंगला मालकासह 11 ग्राहकांवर कारवाई
पोलिसांनी बंगला मालक संजय ब्रिजलाल चौधरी (49, जय समाधी नगर, नंदुरबार), ग्राहक धर्मेश वसंतभाई वसावा (25, उमरपाडा, सुरत), विपूल जयंतीभाई वसावा (27, सागबारा, जि.नर्मदा), हर्षल कांतीलाल पाटील (30, लोणखेडा, ता.शहादा), अशोक सुदाम पाटील (42, लोणखेडा, ता.शहादा), अनमोल कुंवरसिंग वसावा (29, सागबारा, ता.नलगाव, गुजरात), राहुल केशव गमित (34, सिंगपूर, ता.सोनगड), आशिष हिरालाल वसावा (27, मोठी देवरुपण, ता.उमरवाडा, सुरत), हर्षल विश्वनाथ गावीत (26, वडगाव, ता.उमरवाडा, जि.सुरत), नितेश धिरसिंग वसावा (21, वडगाव, ता.उमरवाडा, ता.सुरत), अर्जुन दिनेश वसावा (21, वडगाव, ता.उमरपाडा, जि.सुरत) यांना अटक करण्यात आली तसेच चार पीडीत महिलांना ताबयात घेण्यात आले. पोलिसांनी बंगल्यातून पाच हजार 650 रुपये किंमतीची दारू, गुटखा जप्त केला.




यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनगर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पवार, गुन्हे शाखेसह उपनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !