भुसावळ विभागातील प्रवाशांना दिलासा : उन्हाळी सुटीत तीन मार्गांवर धावणार विशेष गाड्या


भुसावळ (8 एप्रिल 2025) : मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभुमीवर बेलगाम ते महू , वास्को दि गामा ते मुजफ्फरपूर आणि पुणे ते नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही विशेष रेल्वेगाड्यांचा भुसावळ विभागातील प्रवाशांनाही लाभ मिळणार आहे.

या गाड्यांचा प्रवाशांना दिलासा
गाडी क्रमांक 07327 बेलगाम ते महू साप्ताहिक विशेष रेल्वेच्या 12 फेर्‍या होतील. 6 एप्रिल ते 11 मे दरम्यान दर रविवारी बेलगाम येथून 11.30 वाजता सुटेल आणि महू येथे मंगळवारी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07328 विशेष ट्रेन 9 ते 14 मे दरम्यान दर बुधवारी महू येथून रात्री 1़0 वाजता सुटेल आणि बेलगाम येथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पोहचेल. या गाडीला भुसावळ विभागात येताना व जाताना मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा येथे थांबे असतील. गाडी क्रमांक 0731 वास्को दि गामा ते मुजफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीच्या 18 फेर्‍या होतील. 7 एप्रिल ते 2 मे पर्यंत दर सोमवारी वास्को दि गामा येथून दुपारी चार वाजता सुटेल आणि मुजफ्फरपूर येथे बुधवारी दुपारी 12.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07312 विशेष ट्रेन 10 एप्रिल ते 5 मे दरम्यान दर गुरुवारी मुजफ्फरपूर येथून दुपारी 2.45 वाजता सुटेल आणि वास्को दि गामा येथे शनिवारी दुपारी 2.55 वाजता पोहोचेल. या गाडीला विभागात मनमाड, भुसावळ, खंडवा येथे थांबे असतील.


नागपूर-पुणे विशेष गाडी
गाडी क्रमांक 01440 नागपूर ते पुणे साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडीच्या 14 फेर्‍या होतील. ही गाडी 13 एप्रिल ते 25 मे दरम्यान दर रविवारी नागपूर येथून दुपारी 4.15 वाजता सुटेल आणि पुणे येथे सोमवारी सकाळी 7.20 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01439 विशेष ट्रेन 12 एप्रिल ते 24 मे दरम्यान दर शनिवार रोजी पुणे येथून सायंकाळी 7.55 वाजता सुटेल आणि नागपूर येथे रविवारी 2.45 वाजता पोहोचेल. या गाडीला मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !