प्रशांत कोरटकरला अखेर जामीन


Prashant Koratkar finally gets bail कोल्हापूर (9 एप्रिल 2025) : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तथा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याप्रकरणी गत महिन्याभरापासून तुरुंगात असणार्‍या प्रशांत कोरटकरला आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला हा दिलासा दिला आहे.

प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती. त्यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी त्याला महिन्याभरापूर्वी तेलंगणातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने तो जामिनासाठी प्रयत्नशील होता. त्याच्या जामिनावर दोन दिवसांपूर्वीच सुनावणी झाली होती. त्यावर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज झालेल्या संक्षिप्त सुनावणीत कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला.


कोर्टाने यापूर्वी त्याला प्रथम 3, तर नंतर 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. तेव्हाच त्याला जामीन मिळेल असा दावा केला जात होता. त्यानुसार आज त्याला जामीन मिळाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !