भुसावळातील स्वामिनी फाउंडेशनच्या वेशभूषा स्पर्धेत सारीका निकम प्रथम

अलका ढाके द्वितीय, हरणीत कौर तृतीय क्रमांकाच्या मानकरी


Sarika Nikam wins first place in Swamini Foundation’s costume contest in Bhusawal भुसावळ (13 एप्रिल 2025) : शहरातील स्वामिनी फाउंडेशनतर्फे चैत्रोत्सवांतर्गत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात सारीका निकम प्रथम, अलका ढाके द्वितीय, हरणीत कौर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. महिला स्पर्धकांच्या कलात्मकतेचे दर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून घडले. उखाणा स्पर्धेत मृणाल गाडगीळ प्रथम, साधना मोहरील द्वितीय, स्वाती गाजरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका सोनल महाजन होत्या. प्रमुख पाहुण्या समाजसेविका डॉ.छाया देशमुख या होत्या. वेशभूषा व उखाणे स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात ज्योती चौधरी प्रथम, साधना मोहरील द्वितीय, प्रीती चौधरी यांना बक्षिसे लागली. परीक्षक म्हणून डॉ.भाग्यश्री भंगाळे, राजश्री देशमुख यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजश्री देशमुख तर प्रास्ताविक उज्ज्वला बागुल, फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियंका चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. आभार विजया निकम यांनी मानले.


यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
चैत्रोत्सवासाठी स्वामिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियंका चौधरी, उपाध्यक्षा विजया निकम, सचिव उज्ज्वला बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली मेंबर अजिता वडनेरे आरती ठाकूर, रीना गायकवाड, पल्लवी जाधव, कविता महाले, अनिता इंगळे, जया इंगळे, उज्ज्वला पाटील, अमिता जोशी, वैशाली भाकरे व सदस्यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !