लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल एक्स्प्रेस सुधारित गाड्यांच्या क्रमांकासह नॉन-सुपरफास्ट म्हणून धावणार
भुसावळ (मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026) : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल एक्स्प्रेसच्या श्रेणीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सध्या सुपरफास्ट श्रेणीत धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल एक्स्प्रेस प्रवास 2 जानेवारी 2027 पासून तर रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 7 जानेवारी 2027 पासून सुधारित गाडी क्रमांकासह नॉन-सुपरफास्ट श्रेणीत चालविण्यात येणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल एक्सप्रेसचा विद्यमान गाडी क्रमांक 12546 ऐवजी 15546 करण्यात येणार आहे, तर रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसचा विद्यमान गाडी क्रमांक 12545 ऐवजी 15545 असा असेल. संबंधित गाड्या यापुढे नॉन-सुपरफास्ट म्हणून चालवण्यात येतील आणि त्यांचे सुधारित गाडी क्रमांक प्रवाशांनी नोंद घ्यावेत.






प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना सुधारित गाडी क्रमांकाची नोंद घ्यावी आणि तिकीट आरक्षण तसेच प्रवासासंदर्भातील माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा रेल्वेच्या अधिकृत माहिती प्रणालीला भेट द्यावी.