मुलीच्या लग्नासाठी गावी आलेल्या सैन्यातील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू : मोठे वाघोदे गावात शोककळा


An army jawan who came to the village for his daughter’s wedding died of a heart attack  मोठा वाघोदा (14 एप्रिल 2025) : गावातील रहिवासी व मुंबईत सी.आय.एस.एफ.मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक पदावर असलेल्या बुधो राजाराम कचरे (56) यांचे शनिवार, 12 रोजी हृदयविकाराने निधन झाले.

हृदयविकाराने जवानाचा मृत्यू
बुधो कचरे यांच्या मुलीचा विवाह शनिवार, 19 एप्रिल रोजी असल्याने दोन दिवसापूर्वी कचरे हे आपल्या मूळ गावी वाघोदा येथे आले होते. कचरे यांना यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना भुसावळात दाखल करण्यात आले परंतु तेथे उपचार न झाल्याने त्यांना मुंबई येथे हलवत असताना रस्त्यातच त्यांना त्रास जाणवल्याने नाकि येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. घरामध्ये मुलीचे लग्न असल्याने सर्वत्र आनंदी वातावरण होते परंतु वधू पित्याचे निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. जवानावर मोठे वाघोदा येथे शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा, सून, आई, भाऊ असा परिवार आहे. कचरे यांनी 35 वर्ष देशसेवा करीत 22 राज्यांमध्ये सेवा दिली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !