रावेर पोलिसांची मोठी कामगिरी : सहा अल्पवयीन मुलांना शोधले
ओडिशा, मध्यप्रदेशात जावून पोलिसांची यशस्वी कामगिरी
Great achievement by Raver police: Six minors found रावेर (14 एप्रिल 2025) : रावेर पोलिसांनी फुस लाऊन पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना मध्यप्रदेशातून तर दोन अल्पवयीन मुले व दोन अल्पवयीन मुली यांना ओडीसा राज्यात शोधून परत आणले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अल्पवयीनांना पळवल्याप्रकरणी दाखल होते गुन्हे
रावेर पोलीस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुला-मुलींना अज्ञात इसमाने काहीतरी फुस लावून पळवून नेल्याप्रकरणीरावेर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल होते. सिसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाअंती टिकिरी, जि.रायगड ओडीसा मकपदारा येथील जंगलामधून अल्पवयीन दोन मुली व दोन मुलांना शोधण्यात आले तर एका अल्पवयीनास इंदोर येथून तर दुसरीला नायर, ता.खकनार, जि. बर्हाणपूर, मध्यप्रदेश येथून ताब्यात घेत रावेरात आणल्यानंतर आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील, दीपाली पाटील, हवालदार ईश्वर चव्हाण, सुनील वंजारी, कॉन्स्टेबल सचिन घुगे, नितीन सपकाळे, श्रीकांत चव्हाण, गुन्हे शाखेचे गौरव पाटील आदींच्या पथकाने केली.




