नराधमांकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Two minor girls raped by men चिमूर (15 एप्रिल 2025) : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचाराचे प्रमाण थांबलेले नाही. चिमूरमध्येही अशीच एक घटना समोर आली असून एका वस्तीतील दोन अल्पवयीन मुलीवर त्याच वार्डात राहणार्या दोन आरोपीने काही दिवसा अगोदर अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली.
पोलिसांनी आरोपी रशीद रुस्तम शेख व दुसरा आरोपी नसीर वजीर शेख या दोघांना अटक केली आहे.

शहरातील वस्तीत राहणार्या पीडित मुलीचे आई-वडील रोजमजुरी करून परिवार चालवितात. पीडित दोन्ही मुलीचे घर एकमेकाशेजारी आहे. दोन्ही पीडित मुली मैत्रिणी आहेत तर त्याच वॉर्डात राहणारे आरोपी रशीद रुस्तम शेख (नडेवाला) यांनी ओळखीचा फायदा घेत खाऊ देण्याचे आमिष दाखवून मार्च महिन्यात घरी बोलावून दोन्ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
दुसर्या दिवशी दुसरा आरोपी नसीर वजीर शेख (गोलेवाला) यानेही खाऊचे आमिष दाखवून घरी बोलावून अत्याचार अत्याचार केला. हा प्रकार दोन्ही मुलीसोबत सप्टेंबर महिन्यापासून सुरू असल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना तक्रारीत सांगितले. चिमूर पोलिसांनी रात्री दोन्ही आरोपींना अटक करून ताब्यात घेतले असून ठाणेदार संतोष बाकल पुढील तपास करीत आहेत.
संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला घेराव
अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना माहिती होताच शेकडो नागरिक पोलीस ठाण्यावर धडकले व आरोपीला फासीची शिक्षा द्या, अशा घोषणा देत होते. घटनेचे गांभीर्य ओळखत ठाणेदार संतोष बाकल यांनी जास्तीची पोलीस कुमक बोलावून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.
पोलीस ठाण्यासमोर टायर जाळून निषेध
अल्पवायीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचा निषेध करीत संतप्त जमावाने पोलीस ठाण्यापुढे टायर पेटवून निषेध करीत घोषणाबाजी केली.




