तर लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत …..! खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल
So the value of the votes of beloved sisters…..! MP Sanjay Raut’s attack न्युज नेटवर्क । मुंबई (15 एप्रिल 2025) : लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपयेच दिले जाणार आहेत, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनही यासंदर्भात भाष्य केले आहे. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, त्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर आली आहे, ती उद्या शून्यावर येईल, असे राऊत म्हणाले आहेत.
राऊत म्हणाले की, या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचार्यंचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आव आणावा? हे राज्य चालवणे हे आर्थिकदृष्ट्या सोपे राहिलेले नाही. कारण गेल्या साडेतीन वर्षांत या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली आहे. आर्थिक बेशिस्त आणि अर्थिक अराजक अशा खाईत हे राज्य सापडले आहे. एवढेच नाही तर, मिस्टर अजित पवार हे बोलत नसले, तरी, त्यांनाही या चिंतेने ग्रासलेले आहे, असेही राऊत म्हणाले.

