भुसावळातील डॉ.पूजा टोके काठीण्य पातळीतील ‘डीएम’ परीक्षा उत्तीर्ण


Dr. Pooja Toke from Bhusawal passes the ‘DM’ exam of the difficult level भुसावळ (15 मे 2025) : शहरातील रहिवासी असलेल्या डॉ.पूजा निलेश टोके यांनी हने गुजरात कॅन्सर अ‍ॅण्ड रीसर्च इन्स्टिट्यूट, अहमदाबाद येथून काठीण्य पातळीतील डी.एम.(ऑन्कोपॅथोलॉजी) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.

पूजा या डी.एम.गॅस्ट्रोलॉजीस्ट डॉ.निलेश नामदेव टोके यांच्या पत्नी तर .नारखेडे विद्यालयाचे सेवानिवृत शिक्षक नामदेव वामन टोके यांच्या स्नुषा आहेत शिवाय भुसावळ पालिकेचे सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक अशोक प्रल्हाद फालक यांच्या कन्या तसेच भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजु प्रल्हाद फालक यांच्या पुतणी आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल समाजबांधव, मित्रपरिवार, नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !