विरोधात साक्ष दिल्याचा राग : अमळनेर तालुक्यात चौघांनी वाळूच्या डंपरखाली एकाला चिरडले


अमळनेर (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : विरोधात साक्ष देतो यावरून झालेल्या वादामुळे चार जणांनी एकाला वाळूने भरलेल्या डंपर खाली चिरडून ठार मारल्याची घटना 31 रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांद्री गावाच्या बसस्थानकासमोर घडली. खुनाच्या या धक्कादायक घटनेने अमळनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?
नगाव बुद्रुक येथील ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी यांनी फिर्याद दिली की, 28 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी ते त्यांच्या अंगणात मोटरसायकल लावत असताना विपुल किरण गोसावी ,सागर संजय गोसावी, मयुर अनिल बोरसे हे वाळूचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी ट्रॅक्टर मागे घेताना त्यांना धक्का लावला. ते बोलायला गेले असता विपुल, सागर आणि संजयगिर गोसावी व मयुर यांनी त्याला व त्याच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व ट्रॅक्टर बाजूला खाली केले. त्यावेळी ज्ञानेश्वर ने अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.







साक्ष दिल्याच्या रागातून चिरडले
दुसर्‍या दिवशी तलाठी महेंद्र पाटील यांनी पंचनामा केला तेव्हा शरद रतन पाटील हे साक्षीदार झाले. दुसर्‍या दिवशी विपुल याने धमकी दिली की तू आमच्या विरुद्ध साक्षी देतो का, तू रोडवर सापडला की तुला रोडवर चिपकवून देईल, तू कलेक्टर कडे जा की एस.पी.कडे जा, माझे कुणीही काही करणार नाही त्यावेळी लोकांनी शरद रतन पाटील यांची समजूत घातल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही.

जेवायला जाताना घात
31 रोजी रात्री 9:45 वाजता पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांचा वाढदिवस असल्याने शरद रतन पाटील यांच्यासह काही लोक सावखेडा येथील देव हॉटेलवर जेवायला जात असताना नांद्री बसस्टँडला थांबलेले असताना पातोंडा गावाकडून राखाडी रंगाची एक मारुती कार वेगात आली आणि महेश आत्माराम पाटील यांना कट मारून पुढे गेली. पुढे थांबल्यावर त्यातून विपुल गोसावी, मयुर बोरसे आणि सागर गोसावी उतरले त्यावेळी पातोंडाकडून डंपर (क्रमांक एच.आर.37 डी.8957) आला. त्यावरील चालक भरत सुभाष पाटील खाली उतरला आणि शिवीगाळ करू लागला. त्यावेळी प्रवीण गोसावी बोलला की, तुम्ही माणसे मारायला निघाले का ? तेव्हा विपुल गोसावी चालक भरत यास बोलला की यासले जास्त हुई जाईल शे यासले उडाई द्या, मयुर व सागर देखील भरतला सांगितले की यासले चिपकाई द्या, भरत याने जोरात गाडी चालवू लागला असता विपुल व मयुर याने शरद रतन पाटील याला वाहनसमोर ढकलले. सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांना देखील ढकलण्याचा प्रयत्न केला.

संशयीत चिरडल्यानंतर पसार
भरतने शरदच्या अंगावर गाडी चालवली त्यात शरदच्या दोन्ही पायाचा चेंदा मेंदा झाला. ते चौघे पळून गेले. 108 रुग्णवाहिकेने अमळनेर येथे नर्मदा फाउंडेशनला दाखल केले मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने धुळे येथे रवाना करण्यात आले मात्र रस्त्यातच मृत्यू झाला. रात्री आमदार अनिल पाटील यांनी तातडीने दवाखाण्यात भेट घेऊन उपचारासाठी 50 हजारांची मदत केली.

यंत्रणा हलताच डंपर पकडले
उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते यांनी भेट दिली. आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधिक्षकांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाभर यंत्रणा हलली आणि दहिवद फाटा पिंपळी मार्गे पळून गेलेले डंपर बुधगाव येथे पकडण्यात आले. चालकाला रात्रीच अटक करण्यात आली.

ज्ञानेश्वर यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला णे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय गणेश अहिरे करीत आहेत. दरम्यान इतर तीन आरोपी पसार असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !