भरधाव ट्रकच्या धडकेने रणगावातील दोघे दुचाकीस्वार ठार


Two bike riders killed in Rangaon after being hit by a speeding truck रावेर (3 जून 2025) : भरधाव केळी वाहतूक करणार्‍या ट्रकने दुचाकीला उडवल्याने रावेर तालुक्यातील रणगावचे दोघे ठार झाले. हा अपघात सोमवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास अंकलेश्वर ब-हाणपूर महामार्गावर वाघोदा बुद्रुक ते रावेरदरम्यान झाला. लितीन धनराज तावडे (45, रा.रणगाव) व नितीन रामलाल कोळी (35, मोहोद भावासा, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.

लग्नाहून परतताना अपघात
रावेर येथील एका लग्नसमारंभातून घरी रणगावकडे परत जात असताना महामार्गावर मोठे वाघोदा गावाच्या पुढे पेट्रोल पंपाजवळ एस आकाराचे वळण आहे. या वळणाच्या पुढे सावदा येथून केळी भरून जाणारा आयशर ट्रक (एच.आर.5 एडब्ल्यू 03 60) आणि रावेरकडून येारी दुचाकी (एम.एच.19 डी.ई.0168) मध्ये धडक झाल्याने दुचाकीवरील नितीन धनराज तावडे (45, रा.रणगाव) आणि नितीन रामलाल कोळी (35 मोहोद भावासा, मध्य प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला मात्र महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमा तपासणी नाक्यावर त्यास पकडण्यात आले. रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन झाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !