भुसावळात 7 रोजी सदाबहार गीतांचा कार्यक्रम
प्रतिष्ठा महिला मंडळ व सप्तरंग मराठी चॅनलतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
Evergreen songs program on the 7th in Bhusawal भुसावळ (4 जून 2025) : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळ व सप्तरंग मराठी चॅनलतर्फे मराठी व हिंदी सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे शनिवार, 7 रोजी सायंकाळी सहा वाजता मातृभूमी चौकातील संतोषी माता सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख अतिथी म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित राहणार आहेत.
भुसावळकरांना कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
संतोषी माता सभागृहात होणार्या या कार्यक्रमात हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. गायक झाकीर खान, ऐश्वर्या परदेशी, मयूर मोरे, सुरभी गौड, विशाल वानखेडे हे गीतांचे सादरीकरण करतील तर अँकर म्हणून अमित माळी व उमा बागुल असतील. कार्यक्रम भुसावळकरांसाठी मोफत असून अधिकाधिक रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे व सप्तरंग मराठी चॅनलचे संचालक पंकज आर.कासार यांनी केले आहे.







