सांगली महापालिकेचे उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात


Sangli Municipal Corporation Deputy Commissioner in the net of ACB सांगली (9 जून 2025) : सांगली महापालिकेचे उपायुक्तच लाच-लुचपतच्या जाळ्यात अडकले असून सात लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
महापालिका क्षेत्रातल्या एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी 10 लाख रुपयांच्या लाच मागितली व सात लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीला माहिती दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराच्या सांगण्यावरुन सापळा रचला.





तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उपायुक्तांनी सात लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीने उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला. महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !