जैन पर्युषण पर्व काळात भुसावळात कत्तलखाने बंद ठेवा
भुसावळ (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : जैन धर्मियांचे पर्युषण पर्व 8 सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात देशभरात सुरू आहे. सर्वदूर गुरु महाराजांच्या सानिध्यात कठीणहून कठीण अशा तपश्चर्या सुरू असून पवित्र ग्रंथाचे वाचन ही दररोज सुरू आहे. या पर्वकाळात अहिंसा परमोधर्म! जिओ और जिने दो! चा संकल्प सर्वानी केला असून या काळांत शहरातील कत्तलखाने बंद ठेवावे, असे अशी मागणी समाजबांधवांनी केली आहे.
पालिका प्रशासनाने घ्यावी दखल
संघपती जयंतीलाल सुराणा, निर्मल कोठारी, रवी निमाणी, महेंद्र कोठारी, संजय चोरडिया, जे.बी.कोटेचा, मदनलाल ललवाणी, रवींद्र चोरडिया, सनी चोरडिया, मुकेश चोपडा, नितीन सुराणा, राजेश मेहता, बाळू सुराणा, विनोद मेहता, राजेश छाजेड, संजय सुराणा, गौतम चोरडिया, विशाल चोरडीया, विजय चोरडिया, डॉ.सुदेश सांखला, डॉ.मयूर चोरडिया, डॉ.नहार, डॉ.प्रमोद चोरडिया, अशोक डोसी, तिलोकचंद सिसोदिया, धमेंद्र सिसोदिया, अशोकचंद सुराणा, राजेश सुराणा, शिरीष नाहाटा, सुशील कोटेचा, धरमचंद चोपडा, संजय कोटेचा, राजू कोटेचा व जैन बांधवानी आवाहन केले आहे.

