भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या थोर पुरूषांच्या वेशभूषा
भुसावळ (14 ऑगस्ट 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बुधवार, 13 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध वेशभूषा कार्यक्रम झाला. यावेळी शाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत येऊन त्यांनी मार्गदर्शनही केले.
प्रसंगी भारत माता, चाचा नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, मिलीटरी मॅन अशा विविध थोर नेत्यांच्या रुपात शाळेतील इयत्ता नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनियर केजीच्या 150 विद्यार्थ्यांनी वेशभूषा साकारल्या. शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.





