भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये चित्र बनवण्यावर कार्यशाळा
Workshop on drawing at The World School, Bhusawal भुसावळ (14 ऑगस्ट 2025) : शहरातील कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये राखी बनवणे, चित्र तयार करणे, रांगोळी काढणे स्पर्धेचे आयोजन बुधवार, 13 रोजी करण्यात आले.
या स्पर्धेत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे आयोजन द वर्ल्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या स्पर्धा शाळेचे पर्यवेक्षक, शिक्षक वृंद व कर्मचारी यांच्या विशेष सहकार्याने पार पडल्या.





