भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात


The World School BHUSAWAL भुसावळ (15 ऑगस्ट 2025) : शहरातील कोलते फाउंडेशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष निशिकांत कोलते व राजश्री कोलते यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाविषयी मनोगत व्यक्त केले तसेच नृत्य व गायनाद्वारे स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना दिली. यावेळी वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.


या कार्यक्रमास मुख्याध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !